Oct 14, 2020

शिशिर ऋतूमध्ये संचित झालेला कफ वसंत ऋतूमधील प्रखरसूर्यकिरणांनी प्रकुपित झाल्याने अग्निला क्षीण करून अनेक रोग उत्पन्न करतो; म्हणून वसंत ऋतूमध्ये खालील पध्दतीचा आहार विहार ठेवावा.

पथ्य (योग्य)आहार

  • जूने जव, गहू यांचे पदार्थ

  • मधाचा वापर वाढवावा

  • भाजलेले मांस (कोंबडा, बकरा इ.)

  • पचण्यास हलकी व रूक्ष अन्न खावीत (सातू, साळीच्या लाह्या इ.)

  • जल-सुंठयुक्त पाणी

  • मध +साधे पाणी

  • नागरमोथा सिध्द जल पिण्याकरिता वापरावे.

पथ्य (योग्य)विहार

  • वमन, नस्य,- पंचकर्म उपक्रम

  • व्यायाम

  • कापूर, चंदन, अगरू, केशर इ. तूर्णांनी बनलेले सुगंधि उटणे लावून मर्दन करावे.

  • धूम्रपान ( औषधी द्रव्यांचे)

  • कवलधारण (औषधी काढे/ तेले)

  • अंजन इ. चा वापर करावा.

  • सकाळच्या (पहाटेच्या) शीतल हवेमध्ये चालणे

अपथ्य (अयोग्य) आहार

  • पचण्यास जड, आंबट, गोड, स्निग्ध पदार्थांचा वापर करू नये. (उदा. पनीर, चीज, विविध मिठाया, दही इ.)

 

अपथ्य

  • विहार दिवसा झोपू नये.

  • प्रखर सूर्य किरणांचे सेवन करू नये.

 

प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करणे उपचारापेक्षा सदैव श्रेष्ठ आहे

 




Suggested Blogs

Trial Blog

Trial Blog

  •   Dr. Santosh Deshmukh
  •   Jun 23, 2020

Trial

Read More
तुळशीवर उपाय

तुळशीवर उपाय

  •   Dr. Santosh Deshmukh
  •   Oct 10, 2020

Read More

Trial

Trial

  •   Dr. Santosh Deshmukh
  •   Nov 02, 2020

Read More